झाल्या तिन्ही सांजा करुन शिणगार साजा
वाट पाहते मी ग येणार साजन माझा..
या गीताचा मला भावलेला अर्थ मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
दादा कोंडके यांनी लिहिलेलं हे गीत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी ओठावर आहे.
प्रसिद्द लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी या गीतास लावणीचे रूप देऊन अधिकच प्रसिद्द केले.
दादांच्या 'तुमच आमचं जमलं’ या चित्रपटातील हे गीत आहे. चित्रपटाची नायिका दिवसभर कामानिमित्त बाहेर आपल्या पतीची सायंकाळी आतुरतेने वाट पाहत असताना, तिच्या मनात आलेल्या भावना या गीतातून ती व्यक्त करत आहे. प्रसिद्ध संगीतकार राम लक्ष्मण यांनी या गीतास संगीतबद्ध केले आहे. या गीताचा च्या सुरुवातीला बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या गळ्यातील घुंगरांच्या आवाज आणि पिपाणी याचा उत्कृष्ट मिलाफ आहे. तर गीताच्या मध्ये बासरी चा सुंदर साज चढवला आहे. आत्यंतिक विरह झालेली विरहिणी या गीतातून आपल्या भावना व्यक्त करत आहे.
खरंतर दादा कोंडके हे त्यांच्या द्वर्थी संवादासाठी सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या संवादातून गीतातून अनेक अर्थ निघतात. बहुदा त्यांचे संवाद, गीत ही द्वर्थी चावट शृंगारिक अर्थासाठी प्रसिद्ध आहेत.
तसं पाहिलं तर हे गीत अतिशय सरळ, निरागस अशा प्रकारच आहे. या गीतातून त्यांच्या नेहमीच्या सवयीनुसार चावट अर्थ काढणे अवघड आहे. अगदी सरळसरळ आपल्या प्रियकराला भेटायला आतुर झालेली त्याची प्रियकरणीच्या तोंडी येतील तेच शब्द या गीतामध्ये आहेत.
आतापर्यंत दादांच्या वाक्या-वाक्यातून शब्दा-शब्दातून दुहेरी चावट अर्थ काढून श्रोत्यांनी, प्रेक्षकांनी त्याची मजा लुटली आहे.
मुलाखतींमध्ये, भाषणांमध्ये दादांनी त्यांना सेन्सॉर बोर्डात आलेल्या अडचणी सांगताना त्यांनी किती सहजपणे, सरळपणे संवाद लिहिले आहेत, परंतु ऐकणाऱ्या वाचणाऱ्याच्या मनातच भलत-सलत काही असेल तर त्याला माझा नाईलाज आहे असे ते सेन्सॉर बोर्डाला ठणकावून सांगायचे. दादा हे त्यांच्या चावट विनोद निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत, पण खरं सांगायचं तर हा चावटपणा आणि विनोद सर्वप्रथम ऐकणाऱ्याच्या मनामध्ये मेंदूमध्ये असायला हवा तरच त्याला तो अर्थ सुचतो आणि समजतो. दादांची शब्दफेक आणि देहबोली यातूनच सारं काही कळून येतं. दादांचे चित्रपट पाहताना हसून हसून मुरकुंडी वळते, पण ज्याची भाषिक प्रगती झालेली नाही त्याला त्यातला विनोद कळत नाही, आणि दादांचा चित्रपट पाहताना असा so called white collared चुकून शेजारी येऊन मख्खासारखा बसला तर तोही एक विनोदाचाच विषय व्हायचा.
बऱ्याचदा शब्दांचे, दृष्यांचे अर्थ आपण आपल्या मनाप्रमाणे आपल्या चष्म्यातून पाहून काढीत असतो. दादांच्या या ‘झाल्या तिनी सांजा’ या गीताचा मी काढलेला वेगळा अर्थ या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
दादा आणि अध्यात्म यांचा काही संबंध आहे का? अनेक संतानी केलेल्या रचना मधून एक सरळ अर्थ आणि एक गर्भित भावार्थ निघतो, अशा अनेक रचना आपण पाहिलेल्या आहेत. साध्या-साध्या शब्दातून ही संत मंडळी आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातात. अर्थातच आपलं आणि त्यांचं ट्युनिंग किती जमतं यावर ते अवलंबून आहे.
दादांच्या या गीतात मला एक उच्च प्रकारच अध्यात्म जाणवत. अध्यात्म सांगणं व समजून घेण हे आजवर गंभीरपणे पाहिले गेलेले आहे, परंतु दादांचा स्वभाव हलकाफुलका, खोडकर, निरागस, खट्याळ अशा प्रकारचा असल्यामुळे त्यांच्या गीतातल अध्यात्म ही त्याच आयामातून पाहिले पाहिजे असं वाटत.
संत अध्यात्म सांगताना रूपकांचा वापर करतात. अशाच प्रकारे या ठिकाणीही या गीतात रूपकांचा वापर केलेला आहे.
माणसाच्या आयुष्याचे महत्त्वाचे तीन भाग केले तर आयुष्याच्या उत्तरार्धाला संध्याकाळ म्हटलेले आहे. या ठिकाणी दादांची नायिका “झाल्या तिनी सांजा, करुन शिणगार साजा, वाट पाहते मी गं, येणार साजन माझा” असं म्हणते. या ठिकाणी झाल्या तिनी सांजा या शब्दांचा अर्थ आता आयुष्याची संध्याकाळ झालेली आहे, आयुष्याचा उत्तरार्ध झालेला आहे. आणि खुल्या मनाने आनंदाने ही नायिका तिच्या नायकाचा/प्रियकराचा म्हणजेच परमेश्वराची वाट पाहत आहे. या ठिकाणी ती आसुसलेली आहे, आणि मोठ्या आतुरतेने ती साजशृंगार करून वाट बघते आहे. या भूतलावरचा कार्य काळ आता संपला आहे, आता त्या भगवंताची-परमेश्वराची ओढ लागलेली आहे. आणि त्याची वाट ती पाहते आहे. सर्वसामान्य लोक अशी वेळ आली की रडायला लागतात, दुःखी होतात, कष्टी होतात आणि अत्यंत नकारात्मक होतात. दादांचा स्वभावच खट्याळ, हसतमुख, भोळाभाबडा, रडणं नाही कुढणं नाही, हसत-खेळत आलेल्या प्रसंगाला सामोरे जाणे, नुसतच हसत-खेळत नाही तर गाणं म्हणत त्याचे स्वागत करायला ती साज शृंगार करून सज्ज झाली आहे. हे अलौकिकच म्हणायला पाहिजे. ही नायिका म्हणते “प्रीतीच्या दरबारी येणार सरदार, मायेच्या मिठीत त्याच्या गळ्यात घालीन हार” “दिलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा वाट पाहते...” आयुष्याच्या तिनी सांजा झाल्या की लोक घाबरतात, पळ काढतात, लपतात पण या ठिकाणी नायिकेने आत्यंतिक उच्च अध्यात्मिक दृष्टीकोनातून या गोष्टीकडे पाहून हे सर्व मनापासून स्वीकारलंय आणि म्हणून ती तिच्या भगवंताला- परमेश्वराला सरदार म्हणते. हा सरदार तिच्या प्रीतीच्या दरबारी येणार आहे. तो आल्यानंतर त्याच्यातला आणि तिच्यातल द्वैत संपून ती त्याच्यात समर्पित होऊन एकरूप झाली आहे. आणि म्हणून ती पुढे म्हणते या परमेश्वराच्या-भगवंताच्या “मायेच्या मिठीत त्यांच्या गळ्यात घालीन हार” या दिलाच्या देव्हाऱ्यातल्या देवाची पूजा मी हृदयापासून बांधीन.
पुढे ती म्हणते “भेटीत रायाच्या सांगेन मी सारं, सोसवेना बाई मला यौवनाचा भार”. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाला जगण्यासाठी खूप काहीकाही कराव लागत. हे करीत असताना त्याला भलं काय? बुर काय? नैतिक-अनैतिक या सगळ्यातून जाव लागत. असं व्यावहारिक जगात जगत असताना, प्रचंड दडपणातून तो जगत असतो, एक अनामिक भार तो आयुष्यभर वाहत असतो. यालाच ती नायिका म्हणते “सोसवेना बाई मला यौवनाचा भार” आयुष्यभराची भागदौड करून, धावपळ करून आता ती शिणलीय, थकलीय, तहानलीय, आता पाणी पिण्याचही त्राणही राहील नाही. म्हणून ती विनवतीय “तान्हेल्या हरणीला हळूच पाणी पाजा .. वाट पहाते मी गं येणार साजन माझा”
“त्याच्याच ओठांचा ओठी रंग लाल, आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल, धुंद व्हावी राणी रंगून जावा राजा”
आता तो (परमेश्वर ) आणि मी यात अंतर कुठाय तो काही वेगळा थोडाच आहे, त्याचे आणि तिचे ओठही एकाच रंगाचे, धुंद व्हावी राणी रंगून जावा राजा … असं धुंद होऊन जाव कोणतही द्वैत न राहता एकमेकात असं रंगून जाव विरघळून जावं.
“वाटत सख्याच वाजलं पाउल, खट्याळ मनाला वाटे खोटीच चाहूल…” अशा स्थितीत वाटेत एखाद पाउल वाजलं तरी तो आल्याचीच चाहूल लागते, हुरहूर लागते, तोच येतोय असं समजून साद घालावी, पण खोटीच चाहूल असेल तर उगाचच गाजावाजा, त्यामुळे साद घालायची तिची इच्छाही तशीच राहते आणि ती म्हणते “घालू कशी मी साद होईल गाजावाजा .. वाट पाहते मी गं येणार साजन माझा”
आत्ता किती वेळ पाहायचा किती मनाची समजूत घालायची, का वेळ झाला असेल? ती विचारात पडलीये, आता तो आला की त्याला असं बिलगून बसायचं की जसं शंकर-पार्वती (शंभू-सारजा) ती म्हणते “विचार तो पडला विचार मनाला, वेळ का गं व्हावा बाई सख्या सजनाला, बिलगून बसावी शंभूला सारजा .. वाट पाहते मी ग ….”
राजेंद्र धारणकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा