महागडे शिक्षण खालावलेला दर्जा...
शिक्षण म्हणजे नेमके काय? कशासाठी? उपजीविका, भौतिक गरजा, पुस्तकी शिक्षण व्यावहारिक शिक्षण यातील दरी, यशस्वीता म्हणजे काय? त्याचे निकष काय? शिक्षणासाठी आपण काय काय मोजतो? ही आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरित ठेऊन किंवा त्याकडे दुर्लक्ष करून आधीची पिढी पुढच्या पिढीला शिक्षणात ढकलते.
शिक्षित म्हणजे प्रतिष्ठित आणि अशिक्षित म्हणजे अप्रतिष्ठित असे मापदंड समाजात दृढ झाले आहेत. मी काही दिवसांपूर्वीच आलेली ही पोस्ट वाचली,
फर्स्ट क्लास मिळवूनही ज्याला सातबारा आणि 8अ मधला फरक कळत नाही, ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही, ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होतं, ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही, जे आजही कंम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात,
जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात, ज्यांना बँक पासबुकावर व्याजाचा आकडाच सापडत नाही,ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि रिजर्व्हची भानगड कळत नाही,
असे उच्चशिक्षित एकीकडे-
आणि त्या तुलनेत-
तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,
घरातला फ्यूज उडताच वायरमनची वाट न बघणारे,
बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे, मापातले लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे, बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे, आणि हायस्कूलमधून शाळा सोडूनही सिनीयर कॉलेजला पालक म्हणून अधून मधून भेटी देणारे, ट्रॅफिक हवालदार ची ओळख काढून नुसत्या चहावर गाडी सोडवणारे,
निवडणुकीच्या काळात आमदार खासदार सुद्धा गुपचूप घरी येऊन भेट घेणारे.......
मला भयानक आवडतात कारण..
शिक्षण नावाच्या भ्रमातून लवकर बाहेर पडून ते जगायला सज्ज झालेले असतात.
गोष्ट इतकीच, की एवढया उलथापालथी करूनही घरातले म्हणतात.. "पळतंय लई.... पण शिक्षणान थोड् कमी हाय."
थोडक्यात "गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते. शाळेच्या मार्कांनी नाही."
अशी ही पोस्ट एका अर्थाने पुस्तकी/बाजारू शिक्षणातला फोलपणा दाखवणारी आहे.
शिक्षित असूनही स्वतःची उपजीविका करायला असमर्थ तरी प्रतिष्ठित, शिक्षण नसतानाही स्वतःच्या उपजीविकेबरोबर इतरांनाही पोट पाण्याला लावणारा मात्र आप्रितिष्ठित त्यामुळे एका विशिष्ट वर्गाने मोठ्या चलाखीने काही अपवाद वगळता पुस्तकी शिक्षणाला अवास्तव महत्व देऊन जन्माला आलेल्याने पुस्तकी शिक्षण नसल्यास आयुष्य वाया गेले अशा संकल्पनाना जन्म देऊन शिक्षण उद्योग मोठा केला.
महागड्या शिक्षणाचा फटका हा केवळ आर्थिक नाही, केवळ पालकांसाठीही नाही तर तो या देशालाही बसलेला आहे. एखाद्या महायुद्धाने जेवढे नुकसान होणार नाही त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आणि पुढच्या अनेक पिढ्यांना दुष्परिणाम भोगायला लाभेल इतके नुकसानीचे किंवा महागडे शिक्षण या अर्थाने याकडे पाहायला हवे.
शिक्षणाची परिणीती अर्थार्जनात व्हावी ही धारणा एखादे दोन टक्के सोडले तर सर्वांची आहे.
आज मी शिक्षित आहे, पदवीधर, उच्च शिक्षित आहे आणि बेरोजगार आहे अशांची संख्या अफाट आहे. बेरोजगार असण्याचे खापर हे त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांवर फोडले जाते आणी त्यात काही चुकीचे नाही. शिक्षणाने प्रगल्भता यावी, व्यक्तित्वाचा विकास व्हावा, आत्मोद्धार व्हावा, जीवनाचा अर्थ समजावा, जीवन सत्कारणी लागावे हे असायला हवे. शिक्षणाचा प्रारंभी उपयोग हा लिहिता वाचता येणे हा आहे. एकदा लिहिता वाचता येऊ लागले की निरनिराळ्या विषयांची आवड किंवा आवडीच्या विषयातील सखोल अभ्यास करून त्या विषयातील प्राविण्य मिळवता येऊ शकते.
पारंपारीक व्यवसाय उदाहरणार्थ शेती, सुतार काम, लोहारकाम, रंगकाम, शिलाईकाम असे अनेक व्यवसाय पारंपरिकपणे आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीला मिळाले, त्यासाठी कोणतेही शाळा/कॉलेजच्या पठडीतले किंवा बाह्य शिक्षणाची गरज पडली नाही किंवा भासत नाही. आजही अनेक तरुण शिक्षणातल्या पदवीच्या भेंडोळ्या घेऊन बाहेर आल्यानंतर त्याच्या या पारंपरिक व्यवसायात सहजपणे काम करू शकतात. पण या पारंपारीक व्यवसायाखेरीज इतर व्यवसायही मोठ्या प्रमाणात आकर्षित करीत असल्याने मोठ्या संख्येने मुलं अशा व्यवसायासाठी आवश्यक ते शिक्षण घेण्यासाठी आणि पालक त्यांना ते शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त होतात. आणि मग सुरू होतो शिक्षणाचा खेळ, मग त्यासाठी शाळेची निवड, माध्यमाची निवड, त्यासाठी अवाढव्य-अवास्तव फी, बाहेरचे क्लासेस आणि इतर अनावश्यक खर्च. आणि हे सारे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक अशा साधारण 10 वी पर्यंतच्या शिक्षणासाठीच पालकांचा लाखो रुपयात खर्च होतो. बर या शिक्षणातून काय मिळतं, तर भाषा, विज्ञान, गणित व इतर विषयांचं बेसिक ज्ञान. इथपर्यंत आल्यानंतरही त्या मुलाला या शिक्षणातून विशिष्ट काही काम करता येईल उपजीविका साधता येईल अशा प्रकारचा काहीही अभ्यासक्रमात समावेश नसतो. काही अपदात्मक शाळांमध्ये आठवी पासून काही व्यवसाय अभ्यासक्रम शिकवल्या जातात पण त्याचे प्रमाण अत्यंत नगण्य अस आहे. 10वी नंतर शिक्षणातून बाहेर पडणाऱ्या मुलांची संख्या देखील खूप मोठी आहे. म्हणजेच साधारण 12 वर्ष पठडीबंद शिक्षणातूनही काही न मिळाल्याची भावना या मुलांची आणि त्यांच्या पालकांची असते. बारावी आणि त्यानंतर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मुलांचीही अवस्था काही वेगळी नसते. विशिष्ट विषयातली पदवी घेतल्यानंतरही त्या शिक्षणाचं काय करायचं? हे या मुलांना उमगत नाही, ते केवळ त्यांच्या पदवीच्या (शिक्षणाच्या नाही) आधारे नोकरी मिळवण्याच्या मागे लागतात. जसजसे शिक्षण पुढे जाऊ लागते तसतसे त्या मुलाला शारीरिक श्रमाच्या कामा ऐवजी किंवा ज्या कामात शारीरिक श्रम आहेत ते काम माझ्या योग्यतेच नाही ही धारणा तयार होते. त्यामुळे फक्त चार भिंतीच्या आतलं किंवा केबिनमध्ये साहेबी थाटाचच काम मिळालं पाहिजे व पदवी मिळाली म्हणजे तो हक्क मिळाला अशा मानसिकता विद्यार्थी आणि पालकांच्या होतात. आणि नेमकी इथेच फसगत होते. 'खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी' अशा मानसिकतेतून ही मुलं बाहेर पडत नाहीत आणि मग 'तेलही गेलं तूपही गेलं...' अशी स्थिती येते.
आपल्या देशात दरवर्षी सव्वा ते दीड कोटी मुलं जन्माला येतात, व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर भारताच्या मार्केट मध्ये सव्वा ते दीड कोटी नवीन ग्राहक जन्माला येतात, दोन-तीन वर्षानंतर हे एज्युकेशन इंडस्ट्रीचे ग्राहक होतात. पूर्व प्राथमिक चे 2 वर्ष आणि पदवी पर्यंतचे 15 ते 16 वर्ष अशी साधारण 17 ते 18 वर्ष शिक्षणाची आणि प्रत्येक इयत्तेत सव्वा ते दीड कोटी या नुसार दरवर्षी जवळपास 22 ते 27 कोटी कायमस्वरूपी ग्राहक या इंडस्ट्रीला मिळतात. आता प्रत्येक विद्यार्थामागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणारा खर्च, त्याच्या पालकांचा व इतरांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागातील वेळ व खर्च या सर्वाचा हिशोब मांडल्यास पंचवीस ते तीस लाख कोटी रुपयांची उलाढाल या इंडस्ट्री मध्ये होत आहे. माझ्या या आकडेवारीला कोणताही अधिकृत आधार नाही, परंतु आपल्या देशातील जन्मदर, दरवर्षी वाढणारी लोकसंख्या, शाळांची फी, शालेय साहित्य, परीक्षा, वाहतूक, युनिफॉर्म इत्यादी नुसार हिशोब मांडला तरी आकडेवारी स्पष्ट होईल. दरवर्षी 25 कोटी विद्यार्थ्यामागे सरासरी एक लाख इतका खर्च धरला आणि पदवी पर्यंत शिक्षणाची 15 वर्ष धरली तर साधारण 375 लाख कोटी इतका खर्च आपण पदवी पर्यंतच शिक्षण प्राप्त करण्यासाठी करतो. एवढा प्रचंड खर्च केल्यानंतर दरवर्षी साधारण एक कोटी संख्येने बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची अवस्था काय आहे. पदवी साठी आपण(विद्यापीठ) फक्त त्यांनी निवडलेल्या विषयांची परीक्षा घेतो. पण सोळा/सतरा वर्षाच्या पठडीबंद शिक्षणानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात का? पुढचं जीवन जगण्यासाठीचा आत्मविश्वास त्यांना त्या शिक्षणातून मिळाला का? या शिक्षणातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली का? या शिक्षणातून किमान देशाचे आदर्श नागरिक घडलेत का? या आणि अशा इतर परीक्षा आपण घेत नाही. त्यामुळे केवळ पदवीची कागदी भेंडोळी, फुसका बढेजावं, अहंगंड(superiority complex) असलेली मोठी संख्या आपण पाहत आहोत. जसजसे शिक्षण वाढत जाईल तसतसा अहंपणा कमी व्हायला पाहिजे, शिक्षणातून दशदिशा उजळल्या पाहिजेत, लाथ मारील तेथे पाणी काढील असा दुर्दम्य आत्मविश्वास प्रगाढ झाला पाहिजे, पण नेमके याच्या उलटे घडते, केवळ पदवीच्या भेंडोळीच्या आधारे नोकरीच्या प्रतीक्षेत राहून ती न मिळाल्याने त्याची चीड/संताप व्यक्त करणारी असंतोषाने खदखदणारी करोडोच्या संख्येने असणारी युवा पिढी तयार करण्यासाठी आपण केलेला तीनशे ते चारशे कोटींचा खर्च महागात पडणाराच आहे. एकवेळ पैसा भरूनही निघेल पण या तरुणांनी शिक्षणात घालवलेले ऐन उमेदीची व आयुष्याच्या सुरवातीची वर्ष कोण भरून देणार? बर यांचा अभ्यासक्रम काही यांनी ठरवला नाही, नर्सरी पासून पदवी पर्यंतच्या शिक्षण घेण्याच्या तुमच्या शैक्षणिक-अशैक्षणिक अटी-शर्तीही त्यांनी पाळलेल्या आहेत, त्यामुळे आता पदवीपर्यंत शिकलेल्यांच्या पुढच्या व्यवस्थेची जबाबदारी ही शिक्षण देणारांना कशी टाळता येईल? यावर मार्ग काढण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत राजकारण न आणता आमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे असे वाटते.